३५७. अस्त
कधी असतो जागृत मी
कधी असतो निद्रिस्त
कधी कधी होतो मी
उगाच एकदम भिडस्त
कधी असतो मुक्त मी
कधी असतो बंदिस्त
कधी कधी असतो मी
मीच माझा विश्वस्त
कधी असतो सुस्त मी
कधी असतो मस्त
कधी कधी होतो मी
मुळातूनच उध्वस्त
कधी असतो स्वस्थ मी
कधी असतो अस्वस्थ
कधी कधी करतो मी
माझ्याच हस्ते माझाच अस्त
--- लबाड बोका
कधी असतो जागृत मी
कधी असतो निद्रिस्त
कधी कधी होतो मी
उगाच एकदम भिडस्त
कधी असतो मुक्त मी
कधी असतो बंदिस्त
कधी कधी असतो मी
मीच माझा विश्वस्त
कधी असतो सुस्त मी
कधी असतो मस्त
कधी कधी होतो मी
मुळातूनच उध्वस्त
कधी असतो स्वस्थ मी
कधी असतो अस्वस्थ
कधी कधी करतो मी
माझ्याच हस्ते माझाच अस्त
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा