३५८. ती
बसली आहे मनामध्ये
घट्ट घर करून
वाटतं मला कधी कधी
जाईन मी मरून
आनंदात असलो तरी
मध्येच काढते डोकं वर
तिची आठवण आली तरी
काळजामध्ये होतं चर्र
वाढते मग आपोआपच
छातीमधली धडधड
सहनही करता येत नाही
एवढी होते तडफड
आहे ती सर्वव्यापी
काय काय सांगू किती
करतोय जिचं वर्णन एवढं
ती खरंतर आहे भीती
--- लबाड बोका
बसली आहे मनामध्ये
घट्ट घर करून
वाटतं मला कधी कधी
जाईन मी मरून
आनंदात असलो तरी
मध्येच काढते डोकं वर
तिची आठवण आली तरी
काळजामध्ये होतं चर्र
वाढते मग आपोआपच
छातीमधली धडधड
सहनही करता येत नाही
एवढी होते तडफड
आहे ती सर्वव्यापी
काय काय सांगू किती
करतोय जिचं वर्णन एवढं
ती खरंतर आहे भीती
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा