३५९. भीती
जाणवत रहाते आतून
पण दिसत नाही मिती
सतत एक मनामध्ये
वाटत रहाते भीती
करकरणा-या दाराची
पिंपळाखालच्या पाराची
काळोखातल्या अंधाराची
वाटत रहाते भीती
कुणाच्यातरी असण्याची
कुणाच्याही नसण्याची
आणि भेसूर हसण्याची
वाटत रहाते भीती
चारचौघात बसण्याची
लफड्यामध्ये फसण्याची
अमक्या तमक्या मसण्याची
वाटत रहाते भीती
घरामध्ये कलहाची
प्रेमामध्ये विरहाची
भलत्या सलत्या मोहाची
वाटत रहाते भीती
देवळातल्या देवाची
बाटलीतल्या भुताची
कधी कधी स्वताची
वाटत रहाते भीती
सुखामध्ये दुख्खांची
पोटामधल्या भुकांची
कधी कधी तर फुकाची
वाटत रहाते भीती
जिंकताना हरण्याची
जगताना मरण्याची
वेगळं काही करण्याची
वाटत रहाते भीती
मृत्यूनंतरच्या स्थितीची
असहाय्य परिस्थितीची
नागड्या उघड्या वस्तुस्थितीची
वाटत रहाते भीती
--- लबाड बोका
जाणवत रहाते आतून
पण दिसत नाही मिती
सतत एक मनामध्ये
वाटत रहाते भीती
करकरणा-या दाराची
पिंपळाखालच्या पाराची
काळोखातल्या अंधाराची
वाटत रहाते भीती
कुणाच्यातरी असण्याची
कुणाच्याही नसण्याची
आणि भेसूर हसण्याची
वाटत रहाते भीती
चारचौघात बसण्याची
लफड्यामध्ये फसण्याची
अमक्या तमक्या मसण्याची
वाटत रहाते भीती
घरामध्ये कलहाची
प्रेमामध्ये विरहाची
भलत्या सलत्या मोहाची
वाटत रहाते भीती
देवळातल्या देवाची
बाटलीतल्या भुताची
कधी कधी स्वताची
वाटत रहाते भीती
सुखामध्ये दुख्खांची
पोटामधल्या भुकांची
कधी कधी तर फुकाची
वाटत रहाते भीती
जिंकताना हरण्याची
जगताना मरण्याची
वेगळं काही करण्याची
वाटत रहाते भीती
मृत्यूनंतरच्या स्थितीची
असहाय्य परिस्थितीची
नागड्या उघड्या वस्तुस्थितीची
वाटत रहाते भीती
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा