३५५. हसं
ते म्हणतात लंबोदर
मी म्हणतो ढेरपोट्या
ते म्हणतात वक्रतुंड
मी म्हणतो वाकडतोंड्या
अर्थ तोच असतो पण
त्यांना मात्र येतो राग
ते म्हणतात मग मला
तू आपल्या मर्यादेत वाग
ते संस्कृतमध्ये बोलतात
तेच मी मराठीत बोलतो
त्यांना सांगितलं तर म्हणतात
मी नाकाने कांदे सोलतो
एवढीच जर आहे श्रद्धा
म्हणू नका त्याला असं
मला बोलून काय उपयोग
तुमचंच जगात होतंय हसं
--- लबाड बोका
ते म्हणतात लंबोदर
मी म्हणतो ढेरपोट्या
ते म्हणतात वक्रतुंड
मी म्हणतो वाकडतोंड्या
अर्थ तोच असतो पण
त्यांना मात्र येतो राग
ते म्हणतात मग मला
तू आपल्या मर्यादेत वाग
ते संस्कृतमध्ये बोलतात
तेच मी मराठीत बोलतो
त्यांना सांगितलं तर म्हणतात
मी नाकाने कांदे सोलतो
एवढीच जर आहे श्रद्धा
म्हणू नका त्याला असं
मला बोलून काय उपयोग
तुमचंच जगात होतंय हसं
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा