३६३. अध्यात्म
करायचा फक्त आपलाच विचार
आणि करायचा आत्म्याचा
जग गेलं चुलीत तरी
विचार करायचा तादात्म्याचा
लाख दिसतील दुख्खी पिडित
करायचा त्यांच्याकडे कानाडोळा
धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे
पुण्य तेवढं करायचं गोळा
करायचे नाहीत काबाडकष्ट
जगायचं नुसतं आयतं खात
आव मात्र आणायचा असा की
आपणच तेवढे श्रेष्ठ जगात
परलोकीचंही सुख पहायचं
आणि व्हायचं केंद्रित आत्म
ह्याच्यापेक्षा अजून वेगळं
काय असतं असं अध्यात्म
--- लबाड बोका
करायचा फक्त आपलाच विचार
आणि करायचा आत्म्याचा
जग गेलं चुलीत तरी
विचार करायचा तादात्म्याचा
लाख दिसतील दुख्खी पिडित
करायचा त्यांच्याकडे कानाडोळा
धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे
पुण्य तेवढं करायचं गोळा
करायचे नाहीत काबाडकष्ट
जगायचं नुसतं आयतं खात
आव मात्र आणायचा असा की
आपणच तेवढे श्रेष्ठ जगात
परलोकीचंही सुख पहायचं
आणि व्हायचं केंद्रित आत्म
ह्याच्यापेक्षा अजून वेगळं
काय असतं असं अध्यात्म
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा