३६४. धर्म की विज्ञान
धर्माने केलं होतं
जगणंच साधं असह्य
पण विज्ञानामुळे झालंय
आज सगळं सुसह्य
धर्माने नियमांमध्ये
कोंडलं होतं अवकाश
विज्ञानाने दाखवला मात्र
अंधारातही प्रकाश
धर्म देऊ शकला नाही
कधीच नवी दृष्टी
विज्ञानाच्या नियमानुसारच
चालते सगळी सृष्टी
वेगवेगळ्या धर्मांप्रमाणे
शरीर कधी का असतं वेगळं
जन्मापासून मरणापर्यंत
विज्ञानच तर आहे सगळं
धर्माच्याही पूर्वीपासून
विज्ञान आहे ह्या विश्वात
धर्म एकवेळ होईल नष्ट पण
विज्ञान राहिल अस्तित्वात
धर्मावाचून अडत नाही
काहीच माझं ह्या जगात
धर्म मानणारेही सगळे
जातातच ना शेवटी ढगात
--- लबाड बोका
धर्माने केलं होतं
जगणंच साधं असह्य
पण विज्ञानामुळे झालंय
आज सगळं सुसह्य
धर्माने नियमांमध्ये
कोंडलं होतं अवकाश
विज्ञानाने दाखवला मात्र
अंधारातही प्रकाश
धर्म देऊ शकला नाही
कधीच नवी दृष्टी
विज्ञानाच्या नियमानुसारच
चालते सगळी सृष्टी
वेगवेगळ्या धर्मांप्रमाणे
शरीर कधी का असतं वेगळं
जन्मापासून मरणापर्यंत
विज्ञानच तर आहे सगळं
धर्माच्याही पूर्वीपासून
विज्ञान आहे ह्या विश्वात
धर्म एकवेळ होईल नष्ट पण
विज्ञान राहिल अस्तित्वात
धर्मावाचून अडत नाही
काहीच माझं ह्या जगात
धर्म मानणारेही सगळे
जातातच ना शेवटी ढगात
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा