३६२. साक्षात्कारी
भेटत नाही देव सुद्धा
कठोर तप करून
सांगावं लागतं खोटंच मग
आपणच बोंब मारून
लोक सुद्धा ठेवतात विश्वास
देतात फुकट भाव
हळूहळू होतं मग
आपलं मोठं नाव
जगामध्ये ह्या मुर्खांची
नाही काही कमी
कोणी दिली नाही तरी
आपण देऊ शकतो हमी
देव रहातो बाजूलाच
आपणच होतो देव
साक्षात्कारी असतो तेव्हा
आपणच एकमेव
--- लबाड बोका
भेटत नाही देव सुद्धा
कठोर तप करून
सांगावं लागतं खोटंच मग
आपणच बोंब मारून
लोक सुद्धा ठेवतात विश्वास
देतात फुकट भाव
हळूहळू होतं मग
आपलं मोठं नाव
जगामध्ये ह्या मुर्खांची
नाही काही कमी
कोणी दिली नाही तरी
आपण देऊ शकतो हमी
देव रहातो बाजूलाच
आपणच होतो देव
साक्षात्कारी असतो तेव्हा
आपणच एकमेव
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा