३६५. अंकुर
रुजलंय कधीच बी
फुटलाय कधीच कोंब
केली नाही पण मी
मुद्दामच बोंबाबोंब
फुटली नवीन पालवी
फुटले नवे धुमारे
झालो जिवंत पुन्हा मी
युगानंतर सुमारे
आहे भरून चैतन्य
प्रत्येक कणाकणात
एक कळी उमलतेय
आता माझ्या मनात
--- लबाड बोका
रुजलंय कधीच बी
फुटलाय कधीच कोंब
केली नाही पण मी
मुद्दामच बोंबाबोंब
फुटली नवीन पालवी
फुटले नवे धुमारे
झालो जिवंत पुन्हा मी
युगानंतर सुमारे
आहे भरून चैतन्य
प्रत्येक कणाकणात
एक कळी उमलतेय
आता माझ्या मनात
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा