३६८. खोटेपणा
बालविवाह केशवपन
सतीप्रथा शिक्षणबंदी
स्त्रियांना तर नव्हती कधी
जगण्याचीही साधी संधी
देवदासी सारख्या प्रथांचं
जाणून बुजून करून पोषण
देवाधर्माच्या नावानंच ना
चालत होतं स्त्रीचं शोषण
छेडछाडही तेव्हापासून
बलात्कारही होतात अजून
नकार मिळताच फेकतात असिड
हुंड्यासाठी काढतात भाजून
एवढ्या तेवढ्या कारणावरून
नग्न करून काढतात धिंड
वखवखलेल्या नजरांचा
असाच असतो पुरूषी पिंड
परस्त्री म्हणे मानतात माता
सगळा नुसता खोटेपणा
संस्कार संस्कृती परंपरांचा
कशाला सांगताय मोठेपणा
--- लबाड बोका
बालविवाह केशवपन
सतीप्रथा शिक्षणबंदी
स्त्रियांना तर नव्हती कधी
जगण्याचीही साधी संधी
देवदासी सारख्या प्रथांचं
जाणून बुजून करून पोषण
देवाधर्माच्या नावानंच ना
चालत होतं स्त्रीचं शोषण
छेडछाडही तेव्हापासून
बलात्कारही होतात अजून
नकार मिळताच फेकतात असिड
हुंड्यासाठी काढतात भाजून
एवढ्या तेवढ्या कारणावरून
नग्न करून काढतात धिंड
वखवखलेल्या नजरांचा
असाच असतो पुरूषी पिंड
परस्त्री म्हणे मानतात माता
सगळा नुसता खोटेपणा
संस्कार संस्कृती परंपरांचा
कशाला सांगताय मोठेपणा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा