आज सकाळी हत्या करण्यात आलेले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना अर्पण......
३६९. कर्मकहाणी
कुणी केला अपेक्षाभंग
कुणी केला विश्वासघात
कुणी गेला नकळत सोडून
अर्ध्यावरती माझा हात
चाललो होतो पुढे मी
कुणी खेचले मागून पाय
मागितली जेव्हा मदत मी
तोंडावरतीच बोलले नाय
कुणी उठले जीवावरती
कुणी घातले खोटे आळ
अनुभवला नव्हता कधीच मी
ह्यापूर्वी इतका वाईट काळ
काय सांगू तुम्हाला मी
कहाणी माझ्या कर्माची
ही सगळी माणसं होती
माझ्याच जाती धर्माची
--- लबाड बोका
कवितेमागची कहाणी -
आज सकाळी आंघोळ करताना ही कविता सुचली. बाहेर आल्यावर ती डायरीत लिहून काढली. मग मला वाटलं ही कोणाची कर्मकहाणी ? तर समाजसुधारकांची. माझ्या नजरेसमोर ह्या परिस्थितीतून गेलेले महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे आणि त्यांचे पुत्र रं. धो. कर्वे अशी नावं आली. आणि नंतर मी साइटवर गेलो. दुपारी आल्यावर जेवताना टीव्ही लावला. तर डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाल्याची बातमी दिसली. त्यांची जात मला माहित नाही. आणि मला त्याच्याशी काही देणंघेणं नाही. पण लोकांना नादी लावून लुटणा-या बुवाबाबांविरोधात उघड उघड न भीता बोलणारा हा माणूस खरा मर्द मराठा होता. अशाच वेड्या माणसांनी माझा महाराष्ट्र घडवलाय.
त्यांना माझा कडक सलाम !
त्यांना मारणा-यांचा तीव्र निषेध !
आणि साश्रू नयनांनी श्रद्धांजली !

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा