३६७. झंकार
कधी भेटतं नुसतंच कोणी
कोणी ओळखतं थोडंफार
जातं कधी हलकेच कोणी
काळजाचीच छेडून तार
सूर गवसतो आयुष्याचा
झंकारूनी उठतो गंधार
किरण एक आशेचा अन्
येतो भेदून तो अंधार
खोल मनाच्या गाभा-यातून
आनंदे घुमतो हुंकार
गोड शिरशिरी उठते आणिक
तनामनातूनी झंकार
--- लबाड बोका
कधी भेटतं नुसतंच कोणी
कोणी ओळखतं थोडंफार
जातं कधी हलकेच कोणी
काळजाचीच छेडून तार
सूर गवसतो आयुष्याचा
झंकारूनी उठतो गंधार
किरण एक आशेचा अन्
येतो भेदून तो अंधार
खोल मनाच्या गाभा-यातून
आनंदे घुमतो हुंकार
गोड शिरशिरी उठते आणिक
तनामनातूनी झंकार
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा