३७०. आवाहन
शिजला तर शिजू देत
कट माझ्या मरणाचा
विझला तर विझू देत
दिवा माझ्या प्राणांचा
भडकवा नव्या जोमाने
मशाल पुन्हा क्रांतीची
आता तरी द्या सोडून
कास षंढांच्या शांतीची
असेल जरी हा देश
कौरवांचा धृतराष्ट्राचा
पण तुम्ही ठेवा फडकवत उंच
झेंडा पुरोगामी महाराष्ट्राचा
--- डॉक्टर नरेंद्र दाभोळकर
स्पष्टीकरण -
१) कौरव आणि धृतराष्ट्राचं रूपक इथे वापरलंय. कौरव म्हणजे देवाधर्माच्या नावावर लोकांना लुबाडणारे लोक. आणि धृतराष्ट्र म्हणजे अशा लोकांकडे डोळेझाक करणारं सरकार.
२) ही कविता जरी मी केली असली, तरी हे आवाहन कोणी केलंय हे सर्वांना कळावं म्हणून कवितेखाली डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचं नाव टाकलेलं आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा आत्मा बोलला तर काय बोलेल, ही कविकल्पना करून ही कविता केलेली आहे.
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा