३७२. विश्वरूप दर्शन
मीच देतो जन्म आणि
मीच देतो मरण
जगातल्या सा-या घटनांना
मीच आहे कारण
मीच आहे खरं आणि
मीच आहे खोटं
मीच आहे लहान आणि
मीच आहे मोठं
मीच देतो दु:ख आणि
मीच देतो सुख
मीच देतो गाढ निद्रा
मीच तहान भूक
मीच आहे आकार आणि
मीच आहे निराकार
मीच आहे प्रकार आणि
मीच आहे विकार
मीच आहे गीत आणि
मीच आहे संगीत
मीच आहे हार आणि
मीच आहे जीत
मीच आहे चपळ आणि
मीच आहे मख्ख
मीच आहे अंधार आणि
मीच प्रकाश लख्ख
मीच आहे पाप आणि
मीच आहे पुण्य
मीच आहे प्रचंड आणि
मीच आहे शून्य
मीच आहे पृष्ठ आणि
मीच आहे पार्श्व
मीच आहे अणूरेणू
मीच आहे विश्व
मीच आहे स्वर्ग आणि
मीच आहे नरक
मीच आहे एकरूप आणि
मीच आहे फरक
मीच आहे सूर आणि
मीच आहे बेसूर
मीच आहे सुर आणि
मीच आहे असुर
मीच आहे शैथिल्य आणि
मीच आहे हुरूप
मीच आहे सुस्वरूप आणि
मीच आहे कुरूप
मीच आहे सुष्ट आणि
मीच आहे दुष्ट
मीच करतो निर्माण आणि
मीच करतो नष्ट
मीच आहे जवळ आणि
मीच आहे दूर
मीच पाडतो दुष्काळ आणि
मीच आणतो पूर
मीच आहे बाहेर आणि
मीच आहे आत
मीच आहे ह्यात आणि
मीच आहे त्यात
मीच आहे ओहोटी आणि
मीच आहे भरती
मीच आहे खालती आणि
मीच आहे वरती
मीच आहे डावा आणि
मीच आहे उजवा
मीच आहे सूर्य आणि
मीच आहे काजवा
मीच होतो भूषण आणि
मीच देतो दूषण
मीच करतो पोषण आणि
मीच करतो शोषण
मीच करवतो कामकाज
मीच देतो ताज
मीच चढवतो साज आणि
मीच उतरवतो माज
मीच आहे काळा आणि
मीच आहे गोरा
मीच आहे शरम आणि
मीच आहे तोरा
मीच आहे रिक्त आणि
मीच आहे युक्त
मीच आहे बद्ध आणि
मीच आहे मुक्त
मीच आहे हवा आणि
मीच आहे पाणी
मीच आहे मूक आणि
मीच आहे वाणी
मीच आहे डोंगर आणि
मीच आहे द-या
मीच आहे हडळी आणि
मीच मीच आहे प-या
मीच आहे आराम आणि
मीच आहे कष्ट
मीच आहे धूसर आणि
मीच आहे स्पष्ट
मीच आहे सहज आणि
मीच आहे क्लीष्ट
मीच आहे इष्ट आणि
मीच आहे अनिष्ट
मीच आहे शत्रू आणि
मीच आहे मित्र
मीच आहे चित्र आणि
मीच आहे विचित्र
मीच आहे गारवा आणि
मीच आहे ऊब
मीच आहे शुभ आणि
मीच आहे अशुभ
मीच आहे बाप आणि
मीच आहे माय
मीच देतो न्याय आणि
मीच करतो अन्याय
मीच आहे कर्म आणि
मीच आहे मर्म
मीच आहे धर्म आणि
मीच आहे अधर्म
मीच करवतो तप आणि
मीच घडवतो साक्षात्कार
मीच उडवतो हाहाकार आणि
मीच करतो बलात्कार
--- लबाड बोका
मीच देतो जन्म आणि
मीच देतो मरण
जगातल्या सा-या घटनांना
मीच आहे कारण
मीच आहे खरं आणि
मीच आहे खोटं
मीच आहे लहान आणि
मीच आहे मोठं
मीच देतो दु:ख आणि
मीच देतो सुख
मीच देतो गाढ निद्रा
मीच तहान भूक
मीच आहे आकार आणि
मीच आहे निराकार
मीच आहे प्रकार आणि
मीच आहे विकार
मीच आहे गीत आणि
मीच आहे संगीत
मीच आहे हार आणि
मीच आहे जीत
मीच आहे चपळ आणि
मीच आहे मख्ख
मीच आहे अंधार आणि
मीच प्रकाश लख्ख
मीच आहे पाप आणि
मीच आहे पुण्य
मीच आहे प्रचंड आणि
मीच आहे शून्य
मीच आहे पृष्ठ आणि
मीच आहे पार्श्व
मीच आहे अणूरेणू
मीच आहे विश्व
मीच आहे स्वर्ग आणि
मीच आहे नरक
मीच आहे एकरूप आणि
मीच आहे फरक
मीच आहे सूर आणि
मीच आहे बेसूर
मीच आहे सुर आणि
मीच आहे असुर
मीच आहे शैथिल्य आणि
मीच आहे हुरूप
मीच आहे सुस्वरूप आणि
मीच आहे कुरूप
मीच आहे सुष्ट आणि
मीच आहे दुष्ट
मीच करतो निर्माण आणि
मीच करतो नष्ट
मीच आहे जवळ आणि
मीच आहे दूर
मीच पाडतो दुष्काळ आणि
मीच आणतो पूर
मीच आहे बाहेर आणि
मीच आहे आत
मीच आहे ह्यात आणि
मीच आहे त्यात
मीच आहे ओहोटी आणि
मीच आहे भरती
मीच आहे खालती आणि
मीच आहे वरती
मीच आहे डावा आणि
मीच आहे उजवा
मीच आहे सूर्य आणि
मीच आहे काजवा
मीच होतो भूषण आणि
मीच देतो दूषण
मीच करतो पोषण आणि
मीच करतो शोषण
मीच करवतो कामकाज
मीच देतो ताज
मीच चढवतो साज आणि
मीच उतरवतो माज
मीच आहे काळा आणि
मीच आहे गोरा
मीच आहे शरम आणि
मीच आहे तोरा
मीच आहे रिक्त आणि
मीच आहे युक्त
मीच आहे बद्ध आणि
मीच आहे मुक्त
मीच आहे हवा आणि
मीच आहे पाणी
मीच आहे मूक आणि
मीच आहे वाणी
मीच आहे डोंगर आणि
मीच आहे द-या
मीच आहे हडळी आणि
मीच मीच आहे प-या
मीच आहे आराम आणि
मीच आहे कष्ट
मीच आहे धूसर आणि
मीच आहे स्पष्ट
मीच आहे सहज आणि
मीच आहे क्लीष्ट
मीच आहे इष्ट आणि
मीच आहे अनिष्ट
मीच आहे शत्रू आणि
मीच आहे मित्र
मीच आहे चित्र आणि
मीच आहे विचित्र
मीच आहे गारवा आणि
मीच आहे ऊब
मीच आहे शुभ आणि
मीच आहे अशुभ
मीच आहे बाप आणि
मीच आहे माय
मीच देतो न्याय आणि
मीच करतो अन्याय
मीच आहे कर्म आणि
मीच आहे मर्म
मीच आहे धर्म आणि
मीच आहे अधर्म
मीच करवतो तप आणि
मीच घडवतो साक्षात्कार
मीच उडवतो हाहाकार आणि
मीच करतो बलात्कार
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा