३७३. सोस
चिंता असतात सतत मनात
कपाळावर असते सतत आठी
आयुष्य आलंय सरत आता
काहीच नाही अजून गाठी
दुख्ख वेदना दारिद्र्य अपमान
हेच सगळं लागलंय पाठी
सारखी असते घालत घाव
नियतीची ती अदृश्य काठी
आनंदच गेलाय हरवून सगळा
रिकामीच राहिली घरमठी
तरीही वाटतं जगावसं अजून
एखाद्या सुंदर क्षणासाठी
--- लबाड बोका
चिंता असतात सतत मनात
कपाळावर असते सतत आठी
आयुष्य आलंय सरत आता
काहीच नाही अजून गाठी
दुख्ख वेदना दारिद्र्य अपमान
हेच सगळं लागलंय पाठी
सारखी असते घालत घाव
नियतीची ती अदृश्य काठी
आनंदच गेलाय हरवून सगळा
रिकामीच राहिली घरमठी
तरीही वाटतं जगावसं अजून
एखाद्या सुंदर क्षणासाठी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा