३६१. सोबती
मध्येच पडतं ऊन आणि
मध्येच पडतो पाऊस
अजून नाही फिटली पूरी
भिजायची माझी हौस
बघत असतो वाट मी
पुन्हा पुन्हा पावसाची
साठवतो मी आठवण मनात
पावसाच्या दिवसाची
मिळते जेव्हा संधी तेव्हा
भिजतो पावसात चिंब
पाऊस नसतो माझ्यासाठी
पाण्याचे फक्त थेंब
पावसांचं आणि माझं तसं
आहे वेगळंच नातं
तेव्हापासून करतोय सोबत
काहीच नव्हतं ज्ञात
झुरत राहीन आता पुन्हा
पुढच्या वर्षासाठी
माहित नाही असेन का मी
त्याच्या भेटीसाठी
--- लबाड बोका
मध्येच पडतं ऊन आणि
मध्येच पडतो पाऊस
अजून नाही फिटली पूरी
भिजायची माझी हौस
बघत असतो वाट मी
पुन्हा पुन्हा पावसाची
साठवतो मी आठवण मनात
पावसाच्या दिवसाची
मिळते जेव्हा संधी तेव्हा
भिजतो पावसात चिंब
पाऊस नसतो माझ्यासाठी
पाण्याचे फक्त थेंब
पावसांचं आणि माझं तसं
आहे वेगळंच नातं
तेव्हापासून करतोय सोबत
काहीच नव्हतं ज्ञात
झुरत राहीन आता पुन्हा
पुढच्या वर्षासाठी
माहित नाही असेन का मी
त्याच्या भेटीसाठी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा