३७४. दृष्टी
अवाक् करून सोडते मला
विश्वाची ही अनंत पोकळी
आपोआपच गळून पडते
अहंपणाची पुडी मोकळी
येत नाही कल्पना करता
इतकं अफाट आहे विश्व
बसलो होतो कवटाळून मी
काहीतरी भलतंच फसवं
बदलून गेलोय अंतर्बाह्य
आलीय आता नवीच दृष्टी
कशीही जरी असली तरी
माझीच आहे सगळी सृष्टी
--- लबाड बोका
अवाक् करून सोडते मला
विश्वाची ही अनंत पोकळी
आपोआपच गळून पडते
अहंपणाची पुडी मोकळी
येत नाही कल्पना करता
इतकं अफाट आहे विश्व
बसलो होतो कवटाळून मी
काहीतरी भलतंच फसवं
बदलून गेलोय अंतर्बाह्य
आलीय आता नवीच दृष्टी
कशीही जरी असली तरी
माझीच आहे सगळी सृष्टी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा