३७५. श्रद्धा
दिसत नाहीस तू कधी
तरीही वाटतं तू आहेस
कितीही आली संकटं तरी
तूच काढशील वाटतं बाहेर
तू पाठीशी असूनही
ही संकटं येतातच कशी
ह्याचा साधा विचार सुद्धा
करत नाही आम्ही कधी
धजावत नाही मन सुद्धा
करायला अशी चिकित्सा
तू असशील नसशील तरीही
आमची मात्र आहे श्रद्धा
--- लबाड बोका
दिसत नाहीस तू कधी
तरीही वाटतं तू आहेस
कितीही आली संकटं तरी
तूच काढशील वाटतं बाहेर
तू पाठीशी असूनही
ही संकटं येतातच कशी
ह्याचा साधा विचार सुद्धा
करत नाही आम्ही कधी
धजावत नाही मन सुद्धा
करायला अशी चिकित्सा
तू असशील नसशील तरीही
आमची मात्र आहे श्रद्धा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा