३८०. गरीब
केले प्रयत्न तुझ्यासाठी
पण गरीबी तुझी आली आड
राहिली नाही कोणालाही
माणुसकीची साधी चाड
लाख असती व्यसनं दुर्गुण
गेलं असतं तरीही चालून
पैसे असले की मिरवता येतं
प्रतिष्ठेची झूल घालून
केलं असतं श्रीमंत तुला
पण मी सुद्धा आहे गरीब
तुला तरी आहे ती
मला कोणीच नाही करीब
--- लबाड बोका
केले प्रयत्न तुझ्यासाठी
पण गरीबी तुझी आली आड
राहिली नाही कोणालाही
माणुसकीची साधी चाड
लाख असती व्यसनं दुर्गुण
गेलं असतं तरीही चालून
पैसे असले की मिरवता येतं
प्रतिष्ठेची झूल घालून
केलं असतं श्रीमंत तुला
पण मी सुद्धा आहे गरीब
तुला तरी आहे ती
मला कोणीच नाही करीब
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा