३७९. अनुमती
खूपच सुंदर दिसतेस तू
म्हणून पहातो तुला निरखून
पण ती असते दाद त्याला
तू जातेस उगाच हरखून
कित्ती कोमल कांती तुझी
बांधा सुद्धा कित्ती नाजूक
आवडतेस जरी मला तू
त्याचंच वाटतं जास्त कौतुक
स्पर्श तुला मी करतो जेव्हा
तेव्हाही येते तिच अनुभूती
आणखी काही करण्यापूर्वी
म्हणून घेतो तुझी अनुमती
--- लबाड बोका
खूपच सुंदर दिसतेस तू
म्हणून पहातो तुला निरखून
पण ती असते दाद त्याला
तू जातेस उगाच हरखून
कित्ती कोमल कांती तुझी
बांधा सुद्धा कित्ती नाजूक
आवडतेस जरी मला तू
त्याचंच वाटतं जास्त कौतुक
स्पर्श तुला मी करतो जेव्हा
तेव्हाही येते तिच अनुभूती
आणखी काही करण्यापूर्वी
म्हणून घेतो तुझी अनुमती
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा