३८१. परजीवी
सगळेच करतात भक्ती पण
तुम्ही करता भक्तीचं प्रदर्शन
देवाधर्माचा भरवून बाजार
भक्तांचंच करता शोषण
गाळायचा नसतो घाम तुम्हाला
करायचे नसतात काबाडकष्ट
दुस-यांच्या जीवावर जगणारे तुम्ही
म्हणवून घेता स्वत:ला श्रेष्ठ
देवाच्या नावाने मागता भिक
वाटत नाही तुम्हाला लाज
आयतं खाऊन खाऊन मग
येतो तुम्हाला भलताच माज
असेल खरंच देव जर तर
तोच करेल तुमची पारख
खरंच असेल स्वर्ग जर तर
नक्कीच तुम्हाला मिळेल नरक
--- लबाड बोका
सगळेच करतात भक्ती पण
तुम्ही करता भक्तीचं प्रदर्शन
देवाधर्माचा भरवून बाजार
भक्तांचंच करता शोषण
गाळायचा नसतो घाम तुम्हाला
करायचे नसतात काबाडकष्ट
दुस-यांच्या जीवावर जगणारे तुम्ही
म्हणवून घेता स्वत:ला श्रेष्ठ
देवाच्या नावाने मागता भिक
वाटत नाही तुम्हाला लाज
आयतं खाऊन खाऊन मग
येतो तुम्हाला भलताच माज
असेल खरंच देव जर तर
तोच करेल तुमची पारख
खरंच असेल स्वर्ग जर तर
नक्कीच तुम्हाला मिळेल नरक
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा