३८२. उधार
भरपूर गेलाय पाऊस पडून
भरपूर काही गेलंय वाहून
रडतो आहे सुक्यानेच मी
हा सारा विध्वंस पाहून
कुठे गेली माणसं माझी
लागत नाही काहीच पत्ता
इथेच तर होती माझी
थोडी बहुत मालमत्ता
होत्याचं नव्हतं झालं सारं
राहिला नाही काहीच आधार
एकटाच उरलोय जिवंत मी
जगावं लागणार आता उधार
--- लबाड बोका
भरपूर गेलाय पाऊस पडून
भरपूर काही गेलंय वाहून
रडतो आहे सुक्यानेच मी
हा सारा विध्वंस पाहून
कुठे गेली माणसं माझी
लागत नाही काहीच पत्ता
इथेच तर होती माझी
थोडी बहुत मालमत्ता
होत्याचं नव्हतं झालं सारं
राहिला नाही काहीच आधार
एकटाच उरलोय जिवंत मी
जगावं लागणार आता उधार
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा