३८५. शोध
आत्ता कुठे येतोय मी
अंधारातून प्रकाशात
नका दाखवू मार्ग चुकीचा
तुम्ही माझ्या नकाशात
नको तुमच्या पोथ्या अन्
नको तुमची पुराणं
नकोच तुमचं बायबल अन्
नकोच तुमचं कुराण
घेऊ द्या श्वासात मला
शुद्ध हवा भरून
गेलो होतो युगान् युगे
धर्मशास्त्रात गुदमरून
असलो जरी एकटा तरी
वाटत नाही भेव
शोधत होतो ज्याला तो
गवसलाय वाटतं देव
--- लबाड बोका
आत्ता कुठे येतोय मी
अंधारातून प्रकाशात
नका दाखवू मार्ग चुकीचा
तुम्ही माझ्या नकाशात
नको तुमच्या पोथ्या अन्
नको तुमची पुराणं
नकोच तुमचं बायबल अन्
नकोच तुमचं कुराण
घेऊ द्या श्वासात मला
शुद्ध हवा भरून
गेलो होतो युगान् युगे
धर्मशास्त्रात गुदमरून
असलो जरी एकटा तरी
वाटत नाही भेव
शोधत होतो ज्याला तो
गवसलाय वाटतं देव
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा