३८६. तरीही
टांगली आहे घराबाहेर
एक काळी बावली
भितीच वाटते पाहूनही
उलटी तिची सावली
टांगल्या आहेत दारावरती
ओवून लिंबू मिरच्या
परतवू पहातो वाईट शक्ती
येणा-या घरावरच्या
टांगला आहे आढ्याला एक
मंतरलेला कोहळा
होणारच ना तरी सुद्धा
साजरा मरण सोहळा
--- लबाड बोका
टांगली आहे घराबाहेर
एक काळी बावली
भितीच वाटते पाहूनही
उलटी तिची सावली
टांगल्या आहेत दारावरती
ओवून लिंबू मिरच्या
परतवू पहातो वाईट शक्ती
येणा-या घरावरच्या
टांगला आहे आढ्याला एक
मंतरलेला कोहळा
होणारच ना तरी सुद्धा
साजरा मरण सोहळा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा