३८७. नैवेद्य
हळद कुंकू अबीर गुलाल
वहातो तुझ्या वरती
दाखवून तुला धूप दिप
करतो तुझी आरती
वहातो तुला गंध फूल
पडतो तुझ्या पाया
प्रार्थना करून मनोभावे
मागतो तुझी छाया
दाखवतो तुला नैवेद्य
पण देतो तुला धोका
मीच खातो सगळा तो
असा मी लबाड बोका
--- लबाड बोका
हळद कुंकू अबीर गुलाल
वहातो तुझ्या वरती
दाखवून तुला धूप दिप
करतो तुझी आरती
वहातो तुला गंध फूल
पडतो तुझ्या पाया
प्रार्थना करून मनोभावे
मागतो तुझी छाया
दाखवतो तुला नैवेद्य
पण देतो तुला धोका
मीच खातो सगळा तो
असा मी लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा