३८८. मान
पाळतो मी निमूटपणे
परंपरा आणि रुढी
विचारलं जर कारण तर
लोक मनात धरतात अढी
चाललंयच ना पूर्वीपासून
चालू देत तसंच आता
असू देत ना असल्याच तर
शास्त्रामध्ये सगळ्या बाता
काय करायचंय डोकं चालवून
कुठे असे लावायचेत दिवे
राग त्यांना आला तर
फुकट मला मारतील जीवे
म्हणून वागतो त्यांच्याचसारखा
ठेवावंच लागतं तेवढं भान
मारून मुटकून का होईना
रुढी परंपरांचा ठेवतो मान
--- लबाड बोका
पाळतो मी निमूटपणे
परंपरा आणि रुढी
विचारलं जर कारण तर
लोक मनात धरतात अढी
चाललंयच ना पूर्वीपासून
चालू देत तसंच आता
असू देत ना असल्याच तर
शास्त्रामध्ये सगळ्या बाता
काय करायचंय डोकं चालवून
कुठे असे लावायचेत दिवे
राग त्यांना आला तर
फुकट मला मारतील जीवे
म्हणून वागतो त्यांच्याचसारखा
ठेवावंच लागतं तेवढं भान
मारून मुटकून का होईना
रुढी परंपरांचा ठेवतो मान
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा