३८९. सुरक्षित
मलाही आहे डोकं पण
करत नाही कधीच वापर
फोडू शकत नाही मग
माझ्यावरती कुणीच खापर
जात नाही मुळीच मी
चाकोरी सोडून कधीच बाहेर
मळलेलीच वाट मळतो मी
तेवढाच तेवढा धरतो फेर
सुरक्षित जीवन जगतो मी
सुरक्षितपणे करतो आचार
सुरक्षित कसं मरता येईल
याचाही पुन्हा करतो विचार
--- लबाड बोका
मलाही आहे डोकं पण
करत नाही कधीच वापर
फोडू शकत नाही मग
माझ्यावरती कुणीच खापर
जात नाही मुळीच मी
चाकोरी सोडून कधीच बाहेर
मळलेलीच वाट मळतो मी
तेवढाच तेवढा धरतो फेर
सुरक्षित जीवन जगतो मी
सुरक्षितपणे करतो आचार
सुरक्षित कसं मरता येईल
याचाही पुन्हा करतो विचार
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा