३७६. पिंड
प्रत्येकाचा एक असतो पिंड
माझासुद्धा आहे तसा
घेतला आहे माझा मीच
सत्य सांगण्याचा वसा
ठाऊक आहे मलाही पक्कं
खडतर आहे हा प्रवास
टाळतात लोक तोंडावरती
पाठीमागून देतात त्रास
निर्माण झालेत शत्रू अनेक
जीवालाही आहे धोका
घाबरत नाही कोणाला मी
बिनधास्त नडतो वाईट लोका
येवोत कोणीही अंगावरती
करायचा तेवढा करोत कल्ला
नाही काही मी अहिंसावादी
मीच करीन पहिला हल्ला
--- लबाड बोका
प्रत्येकाचा एक असतो पिंड
माझासुद्धा आहे तसा
घेतला आहे माझा मीच
सत्य सांगण्याचा वसा
ठाऊक आहे मलाही पक्कं
खडतर आहे हा प्रवास
टाळतात लोक तोंडावरती
पाठीमागून देतात त्रास
निर्माण झालेत शत्रू अनेक
जीवालाही आहे धोका
घाबरत नाही कोणाला मी
बिनधास्त नडतो वाईट लोका
येवोत कोणीही अंगावरती
करायचा तेवढा करोत कल्ला
नाही काही मी अहिंसावादी
मीच करीन पहिला हल्ला
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा