३७७. चमत्कार
एक बंद झाल्यावर म्हणे
दुसरं कुठेतरी उघडतं दार
दिसत नाही कुठेच ते
शोधूनही फार फार
कळत नाही काय करावं
दैवावरच शेवटी भार
परिस्थितीच असते तशी
देत नाही कुणीच थार
आयुष्यच नकोसं वाटतं तेव्हा
नेमका होतो चमत्कार
तेव्हाच भेटतं अवचित कुणी
देवाचाच घेऊन अवतार
--- लबाड बोका
एक बंद झाल्यावर म्हणे
दुसरं कुठेतरी उघडतं दार
दिसत नाही कुठेच ते
शोधूनही फार फार
कळत नाही काय करावं
दैवावरच शेवटी भार
परिस्थितीच असते तशी
देत नाही कुणीच थार
आयुष्यच नकोसं वाटतं तेव्हा
नेमका होतो चमत्कार
तेव्हाच भेटतं अवचित कुणी
देवाचाच घेऊन अवतार
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा