३९७. अंदाज
डोळे वटारून पहात असते
देवळामधली मूर्ती
भीती वाटून उडते मग
घाबरगुंडी पुरती
खाऊ की गिळू नजरेने
पहाते ती मला
पाया पडण्यासाठी म्हणून
आलो होतो भला
काहीतरी चुकतंय वाटतं
तिचं नाहीतर माझं
एवढाच करू शकतो ना
मी तरी अंदाज
--- लबाड बोका
डोळे वटारून पहात असते
देवळामधली मूर्ती
भीती वाटून उडते मग
घाबरगुंडी पुरती
खाऊ की गिळू नजरेने
पहाते ती मला
पाया पडण्यासाठी म्हणून
आलो होतो भला
काहीतरी चुकतंय वाटतं
तिचं नाहीतर माझं
एवढाच करू शकतो ना
मी तरी अंदाज
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा