३९६. बंदी
सगळ्यांचं चालत असतं पण
तुझंच चालत नसतं नाणं
बघावं तेव्हा गात असतोस
तेच तुझं पुन्हा रडगाणं
असं वाटतं सगळ्या जगात
तूच तेवढा आहेस दु:खी
मुक्या मुक्यानेच मेले कितीक
ते सगळे होते सुखी
हाती पायी आहेस धड
का घालवतोस जन्म वाया
डोळे उघडून बघ जरा
मिळणार नाही पुन्हा ही काया
गेली नाहीय अजून वेळ
मिळत नसते पुन्हा संधी
बघ जगून आनंदाने
होऊ नकोस स्व:ताचाच बंदी
--- लबाड बोका
सगळ्यांचं चालत असतं पण
तुझंच चालत नसतं नाणं
बघावं तेव्हा गात असतोस
तेच तुझं पुन्हा रडगाणं
असं वाटतं सगळ्या जगात
तूच तेवढा आहेस दु:खी
मुक्या मुक्यानेच मेले कितीक
ते सगळे होते सुखी
हाती पायी आहेस धड
का घालवतोस जन्म वाया
डोळे उघडून बघ जरा
मिळणार नाही पुन्हा ही काया
गेली नाहीय अजून वेळ
मिळत नसते पुन्हा संधी
बघ जगून आनंदाने
होऊ नकोस स्व:ताचाच बंदी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा