३९९. तथ्य
परंपराही येतात मोडता
पण त्यासाठी लागते हिम्मत
मोजावी लागते कधी कधी
प्राणांची सुद्धा किम्मत
काळीज लागतं वाघाचं
तेव्हाच घेता येते टक्कर
घाण्याभोवती फिरून गोल
येणारच ना नाहीतर चक्कर
देवाने दिलीय स्वतंत्र बुद्धी
करा जरा तिचा उपयोग
ख-या खोट्यात करा फरक
नाहीतर भोगा आपले भोग
करा चिकित्सा डोळसपणे
म्हणजे मग कळेल सत्य
हजारो वर्षांच्या परंपरांमागे
काय आहे नेमकं तथ्य
--- लबाड बोका
परंपराही येतात मोडता
पण त्यासाठी लागते हिम्मत
मोजावी लागते कधी कधी
प्राणांची सुद्धा किम्मत
काळीज लागतं वाघाचं
तेव्हाच घेता येते टक्कर
घाण्याभोवती फिरून गोल
येणारच ना नाहीतर चक्कर
देवाने दिलीय स्वतंत्र बुद्धी
करा जरा तिचा उपयोग
ख-या खोट्यात करा फरक
नाहीतर भोगा आपले भोग
करा चिकित्सा डोळसपणे
म्हणजे मग कळेल सत्य
हजारो वर्षांच्या परंपरांमागे
काय आहे नेमकं तथ्य
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा