४००. सार्थक
तिला पाहून होतो मला
खरंच मनापासून हर्ष
अनुभवला नव्हता कधीच मी
इतका मऊ मुलायम स्पर्श
मला पहाताच हसते ती
तोंड भरून आनंदाने
होऊन जातं मन प्रसन्न
गाऊ लागतं आपसूक गाणे
देईन तिला सारी सुखं
स्वप्न पहातो भविष्याचं
तिच्यामुळेच झालंय आता
सार्थक माझ्या आयुष्याचं
--- लबाड बोका
तिला पाहून होतो मला
खरंच मनापासून हर्ष
अनुभवला नव्हता कधीच मी
इतका मऊ मुलायम स्पर्श
मला पहाताच हसते ती
तोंड भरून आनंदाने
होऊन जातं मन प्रसन्न
गाऊ लागतं आपसूक गाणे
देईन तिला सारी सुखं
स्वप्न पहातो भविष्याचं
तिच्यामुळेच झालंय आता
सार्थक माझ्या आयुष्याचं
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा