३९२. खेळ
नाही नाही म्हणता
मलाही लागली सवय
तुमच्याकडून आता मला
काही ना काही हवंय
दिल्यात जरी शिव्याशाप
पडणार नाहीत भोकं
बिघडवू शकत नाही
काहीच माझं लोकं
द्या समजून तुम्हीच आता
काही चहापाणी
जास्त नाही अपेक्षा करत
काय सांगू आणि
गरीब असाल तुम्ही तर
द्या थोडं कमी
घेतल्याशिवाय सोडणार नाही
तुम्हाला मुळीच मी
काम तुमचंच होईल पटकन
लागणार नाही वेळ
समजून उमजून घ्यायचाच तर
आहे हा सगळा खेळ
--- लबाड बोका
नाही नाही म्हणता
मलाही लागली सवय
तुमच्याकडून आता मला
काही ना काही हवंय
दिल्यात जरी शिव्याशाप
पडणार नाहीत भोकं
बिघडवू शकत नाही
काहीच माझं लोकं
द्या समजून तुम्हीच आता
काही चहापाणी
जास्त नाही अपेक्षा करत
काय सांगू आणि
गरीब असाल तुम्ही तर
द्या थोडं कमी
घेतल्याशिवाय सोडणार नाही
तुम्हाला मुळीच मी
काम तुमचंच होईल पटकन
लागणार नाही वेळ
समजून उमजून घ्यायचाच तर
आहे हा सगळा खेळ
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा