४०१. स्वातंत्र्य सूक्त
जगायचा आहे मनसोक्त मला
निसटून चाललेला हा जन्म
लुडबूड करतोय आयुष्यामधी
तथाकथित हा माझा धर्म
जन्मापासूनच बसला आहे
कायम माझ्या बोकांडी
कधी करतो माझ्याकडून
कुणाचीतरी काळीकांडी
करून ठेवलंय गुलाम मला
पण व्हायचं आहे आता मुक्त
गातो आता आनंदाने
माझ्या स्वातंत्र्याचं सूक्त
--- लबाड बोका
जगायचा आहे मनसोक्त मला
निसटून चाललेला हा जन्म
लुडबूड करतोय आयुष्यामधी
तथाकथित हा माझा धर्म
जन्मापासूनच बसला आहे
कायम माझ्या बोकांडी
कधी करतो माझ्याकडून
कुणाचीतरी काळीकांडी
करून ठेवलंय गुलाम मला
पण व्हायचं आहे आता मुक्त
गातो आता आनंदाने
माझ्या स्वातंत्र्याचं सूक्त
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा