४०३. निराधार
पळायला जेव्हा असते संधी
तेव्हा सगळेच काढतात पळ
ओढून ताणून आणत नाहीत
अशावेळी कोणीच बळ
पराभव समोर दिसला की
तलवारी सुद्धा होतात म्यान
जीवच वाटतो महत्त्वाचा
कसली तत्त्व नी कसली आण
पर्यायच नसतो दुसरा जेव्हा
व्हावंच लागतं जीवावर उदार
देवसुद्धा देत नाही
अशावेळी काहीच आधार
--- लबाड बोका
पळायला जेव्हा असते संधी
तेव्हा सगळेच काढतात पळ
ओढून ताणून आणत नाहीत
अशावेळी कोणीच बळ
पराभव समोर दिसला की
तलवारी सुद्धा होतात म्यान
जीवच वाटतो महत्त्वाचा
कसली तत्त्व नी कसली आण
पर्यायच नसतो दुसरा जेव्हा
व्हावंच लागतं जीवावर उदार
देवसुद्धा देत नाही
अशावेळी काहीच आधार
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा