४०४. सलाम
कुणी असतो कळत नकळत
आपल्या आपल्या कर्माचा
कुणी असतो जाणून बुजून
जातीचा नी धर्माचा
कुणी असतो प्रकृतीचा
कुणी असतो विकृतीचा
कुणी असतो तथाकथित
महान अशा संस्कृतीचा
कुणी असतो बुवाचा
कुणी असतो नेत्याचा
कुणी असतो स्वातंत्र्यातही
मनामधून जेत्याचा
कुणी असतो चाकोरीचा
कुणी असतो चाकरीचा
कुणी असतो पोट भरूनही
आणखी चतकोर भाकरीचा
कुणी असतो झिलईचा
कुणी असतो दुलईचा
कुणी असतो उच्चपदी तरी
वरून मिळणा-या मलईचा
सगळे असे असले तरी
मी मात्र नाही गुलाम
मनापासून करतो मी
माझ्या स्वातंत्र्याला सलाम
--- लबाड बोका
कुणी असतो कळत नकळत
आपल्या आपल्या कर्माचा
कुणी असतो जाणून बुजून
जातीचा नी धर्माचा
कुणी असतो प्रकृतीचा
कुणी असतो विकृतीचा
कुणी असतो तथाकथित
महान अशा संस्कृतीचा
कुणी असतो बुवाचा
कुणी असतो नेत्याचा
कुणी असतो स्वातंत्र्यातही
मनामधून जेत्याचा
कुणी असतो चाकोरीचा
कुणी असतो चाकरीचा
कुणी असतो पोट भरूनही
आणखी चतकोर भाकरीचा
कुणी असतो झिलईचा
कुणी असतो दुलईचा
कुणी असतो उच्चपदी तरी
वरून मिळणा-या मलईचा
सगळे असे असले तरी
मी मात्र नाही गुलाम
मनापासून करतो मी
माझ्या स्वातंत्र्याला सलाम
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा