सुस्वागतम् !
ह्या ब्लॉगला भेट देणा-या सर्व वाचकांचे हार्दिक स्वागत !
गारूड
घालतो मी कवितांमधून
भावनांनाच सरळ हात
प्रयत्न करतो लावण्याचा
वातीनेच दुसरी वात
कविता असतात उत्कट माझ्या
कृत्रिमतेचा नसतो लेश
त्या दैवी कृपेचा प्रसाद
तुमच्यासाठीही करतो पेश
विचार माझ्या कवितांमधले
होतील मनावरती आरूढ
जेव्हा वाचाल कविता माझ्या
पडेल तुमच्यावरती गारूड
--- लबाड बोका
ह्या ब्लॉगवर फक्त माझ्या म्हणजे लबाड बोक्याच्या मराठी कविता आहेत.
ही पोस्ट वाचत स्क्रोल करत खाली खाली गेल्यास तुम्हाला कविता वाचता येतील.
ह्या पेजवरील कविता जिथे संपतात, तिथे तळाला खाली ' जरा जुनी पोस्ट ' असे
लिहिलेले दिसेल. त्यावर क्लीक केल्यास मागच्या पानावरील कविता वाचता येतील.
ह्या पोस्टच्या बाजूला मॅवमॅव, प्रेमानुनय असे लिहिलेले दिसेल.
त्यांवर क्लीक केल्यास तुम्हाला माझ्या ' मनबिंब ' व्यतिरिक्त इतर ब्लॉगवरील
कविता वाचायला मिळतील.
मनबिंब, मॅवमॅव, प्रेमानुनय हे स्वतंत्र ब्लॉग आहेत.
ज्यांना दर्जात्मक कविता आवडतात त्यांनी 'मनबिंब'ला भेट द्यावी.
ज्यांना वात्रटिका, चारोळ्या आवडतात त्यांनी 'मॅव मॅव'ला भेट द्यावी.
ज्यांना प्रेमकविता आवडतात त्यांनी 'प्रेमानुनय'ला भेट द्यावी.
धन्यवाद !
आपला
लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा