३९५. सुरक्षित
कसा लागेल निभाव माझा
ह्या असल्या निष्ठुर जगात
नकोच वाटतं बाहेर पडणं
सुरक्षित वाटतं आतल्या आत
नको नको ती जीवघेणी स्पर्धा
जगणंच सगळं जातं राहून
काय उपयोग सांगा तर मग
माणसाचा हा जन्म घेऊन
द्वेष राग मत्सर मद
वातावरणच झालंय दुषित
म्हणून होतो लहान मी
जातो पुन्हा आईच्या कुशीत
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा