४११. देव आणि मी
देव म्हणे असतो भुकेला
भक्ती आणि भावाचा
मी मात्र असतो भुकेला
फक्त चहापाण्याचा
देव म्हणे होतो प्रसन्न
देऊन टाकतो मग वर
मी मात्र बघत असतो
काही मिळतेय का भर
देव म्हणे करतो मदत
पण मी मात्र आहे खरा
करीन तुमची कामं मी
माझ्याकडे पण पहा जरा
--- लबाड बोका
देव म्हणे असतो भुकेला
भक्ती आणि भावाचा
मी मात्र असतो भुकेला
फक्त चहापाण्याचा
देव म्हणे होतो प्रसन्न
देऊन टाकतो मग वर
मी मात्र बघत असतो
काही मिळतेय का भर
देव म्हणे करतो मदत
पण मी मात्र आहे खरा
करीन तुमची कामं मी
माझ्याकडे पण पहा जरा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा