४१२. विश्व
एक वर्तुळ रेखाटलं मी
सकाळी क्षितिजावरती
लावली त्याला आग तर
त्याचा झाला सूर्य
अशाच एका रात्री मग
रेखाटला मी चंद्र
चुकून जेव्हा पुसला गेला
झाली तेव्हा अमावास्या
वाटत होतं कसंतरीच
नुसतंच काळोखं आभाळ
म्हणून टांगले दिवे तर
त्यांचे झाले तारे
मीच केली निर्माण
सारीच सुख्ख दुख्ख
तुकडे तुकडे जोडत गेलो
बनून गेलं विश्व
--- लबाड बोका
एक वर्तुळ रेखाटलं मी
सकाळी क्षितिजावरती
लावली त्याला आग तर
त्याचा झाला सूर्य
अशाच एका रात्री मग
रेखाटला मी चंद्र
चुकून जेव्हा पुसला गेला
झाली तेव्हा अमावास्या
वाटत होतं कसंतरीच
नुसतंच काळोखं आभाळ
म्हणून टांगले दिवे तर
त्यांचे झाले तारे
मीच केली निर्माण
सारीच सुख्ख दुख्ख
तुकडे तुकडे जोडत गेलो
बनून गेलं विश्व
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा