४१३. अर्थ
आलो परतून पुन्हा एकदा
भरवसा तरीही न होता
होतो करत बचाव माझा
पण आवाज क्षीण होता
काहीच नाही बोललीस तू
पण अश्रू वाहिला होता
तुझ्या मिटल्या डोळ्यांतही
मी भाव पाहिला होता
घेतला मी समजून माझा
अर्थ त्यातला होता
भेट नाही पुन्हा कधीही
हा निरोप त्यातला होता
--- लबाड बोका
आलो परतून पुन्हा एकदा
भरवसा तरीही न होता
होतो करत बचाव माझा
पण आवाज क्षीण होता
काहीच नाही बोललीस तू
पण अश्रू वाहिला होता
तुझ्या मिटल्या डोळ्यांतही
मी भाव पाहिला होता
घेतला मी समजून माझा
अर्थ त्यातला होता
भेट नाही पुन्हा कधीही
हा निरोप त्यातला होता
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा