४१५. झेंडा
कधी ह्याचा कधी त्याचा
खांद्यावर मी घेतो झेंडा
कळतच नाही कसा काय ते
कधी कापतात बुडखा शेंडा
नवा नवा तो असतो तेव्हा
वा-यावरती उंच फडकतो
कळतच नाही कसा काय ते
कधी अचानक कुठे अडकतो
कधी वाहतात वादळवारे
जीव वाचवण्या मी धडपडतो
कळतच नाही कसा काय ते
कधी हातातून खाली पडतो
--- लबाड बोका
कधी ह्याचा कधी त्याचा
खांद्यावर मी घेतो झेंडा
कळतच नाही कसा काय ते
कधी कापतात बुडखा शेंडा
नवा नवा तो असतो तेव्हा
वा-यावरती उंच फडकतो
कळतच नाही कसा काय ते
कधी अचानक कुठे अडकतो
कधी वाहतात वादळवारे
जीव वाचवण्या मी धडपडतो
कळतच नाही कसा काय ते
कधी हातातून खाली पडतो
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा