४०८. देशभक्त
सूट म्हटलं की सूट
ऊठ म्हटलं की ऊठ
ते सांगतील तेच खरं
बाकी सगळं झूठ
ते चांगले की वाईट
त्याला नसतं देणंघेणं
झापड लावून बुद्धीवरती
तो जगतो लाचार जिणं
ते तर करत असतात
राजरोस देशाचंच भक्षण
देशाचं रक्षण करायचं सोडून
तो करतो त्यांचंच रक्षण
तो असतो आज्ञाधारक
त्याला कळतो हुकूम फक्त
देशाची लागतेय वाट तरी
तो असतो देशभक्त
--- लबाड बोका
सूट म्हटलं की सूट
ऊठ म्हटलं की ऊठ
ते सांगतील तेच खरं
बाकी सगळं झूठ
ते चांगले की वाईट
त्याला नसतं देणंघेणं
झापड लावून बुद्धीवरती
तो जगतो लाचार जिणं
ते तर करत असतात
राजरोस देशाचंच भक्षण
देशाचं रक्षण करायचं सोडून
तो करतो त्यांचंच रक्षण
तो असतो आज्ञाधारक
त्याला कळतो हुकूम फक्त
देशाची लागतेय वाट तरी
तो असतो देशभक्त
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा