४१८. खरं श्रेय
कविता असतेच दडलेली
तुमच्या सुद्धा मनात
तिच करतो उघड मी
लिहितो पाना पानात
तुमच्याच असतात भावना
तुमचेच असतात शब्द
म्हणूनच तर होता तुम्ही
त्या कवितेवर लुब्ध
तुम्हीच देता बळ आणि
तुम्हीच होता कारण
मी मात्र खातो भाव
उगाच विनाकारण
--- लबाड बोका
कविता असतेच दडलेली
तुमच्या सुद्धा मनात
तिच करतो उघड मी
लिहितो पाना पानात
तुमच्याच असतात भावना
तुमचेच असतात शब्द
म्हणूनच तर होता तुम्ही
त्या कवितेवर लुब्ध
तुम्हीच देता बळ आणि
तुम्हीच होता कारण
मी मात्र खातो भाव
उगाच विनाकारण
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा