४२०. स्वार्थ
कधी तरी करतो मी
नविन एखादी कृती
धोक्यामध्येच येते तेव्हा
प्राचीन सारी संस्कृती
माझ्या अशा वागण्यामुळे
हादरून जातो पूरा देश
द्यायचा नसतो मला जरी
ह्यामधून कोणताच संदेश
समर्थनार्थ केलं मी
काही जरी विधान
बोंबलतात लगेच सगळे
मोडलं मी संविधान
होते उगाच बोंबाबोंब
होतात मनाला वेदना
जाग्या होतात आपोआप
समाजाच्या संवेदना
दुखावल्या जातात नेमक्या
कोणाकोणाच्या भावना
करू लागतात मग
सरळ माझी संभावना
तापू लागतं वातावरण
झडू लागतात वाद
कोणीच साधत नाही
थेट माझ्याशी संवाद
कोणी कोणी तर करतात
माझ्याविरूद्ध गुप्त कट
येत असतं अंगावरती
एकामागून एक संकट
हे सारं पाहून माझी
गुंग होऊन जाते मती
आणखी कोणी देत असतात
ह्या सा-याला मूक संमती
असतात तसे सारे साले
म्होरके फक्त चार
पण मुश्कील करून टाकतात
माझा मुक्त संचार
देतात करून लोकांचा ते
वेगळाच काही ग्रह
पडत नाही उपयोगी तेव्हा
माझाही लोकसंग्रह
दिसू लागतो मला मग
जिथे तिथे यम
ठेवतो मी कसातरी
भावनांवरती संयम
ह्या सा-याशी लढताना
थकून जातो देह
तरीही येत नाही मनात
यत्किंचितही संदेह
लागतो मला हळूहळू
ह्या सा-याचा अर्थ
साधू पहात असतो खरंतर
प्रत्येक जण आपलाच स्वार्थ
--- लबाड बोका
कधी तरी करतो मी
नविन एखादी कृती
धोक्यामध्येच येते तेव्हा
प्राचीन सारी संस्कृती
माझ्या अशा वागण्यामुळे
हादरून जातो पूरा देश
द्यायचा नसतो मला जरी
ह्यामधून कोणताच संदेश
समर्थनार्थ केलं मी
काही जरी विधान
बोंबलतात लगेच सगळे
मोडलं मी संविधान
होते उगाच बोंबाबोंब
होतात मनाला वेदना
जाग्या होतात आपोआप
समाजाच्या संवेदना
दुखावल्या जातात नेमक्या
कोणाकोणाच्या भावना
करू लागतात मग
सरळ माझी संभावना
तापू लागतं वातावरण
झडू लागतात वाद
कोणीच साधत नाही
थेट माझ्याशी संवाद
कोणी कोणी तर करतात
माझ्याविरूद्ध गुप्त कट
येत असतं अंगावरती
एकामागून एक संकट
हे सारं पाहून माझी
गुंग होऊन जाते मती
आणखी कोणी देत असतात
ह्या सा-याला मूक संमती
असतात तसे सारे साले
म्होरके फक्त चार
पण मुश्कील करून टाकतात
माझा मुक्त संचार
देतात करून लोकांचा ते
वेगळाच काही ग्रह
पडत नाही उपयोगी तेव्हा
माझाही लोकसंग्रह
दिसू लागतो मला मग
जिथे तिथे यम
ठेवतो मी कसातरी
भावनांवरती संयम
ह्या सा-याशी लढताना
थकून जातो देह
तरीही येत नाही मनात
यत्किंचितही संदेह
लागतो मला हळूहळू
ह्या सा-याचा अर्थ
साधू पहात असतो खरंतर
प्रत्येक जण आपलाच स्वार्थ
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा