४२३. भिकारी
माझ्या साध्या फुंकरीने
वाहू लागायचे वारे
मीच होते भिरकावले
आकाशामध्ये तारे
एवढा मोठा समुद्र सुद्धा
प्यायचो मी घोटात
शनीची सगळी कडी तर
घालायचो मी बोटात
मीच द्यायचो ताप तेव्हा
सा-या या दुनियेला
तेच माझं तेज सारं
मीच दिलं सुर्याला
कधी बरसायचो हवा तसा
बुडवायचो जगाला
तेच सारं जल माझं
मीच दिलं ढगाला
होतं सारं माझ्याकडे
झालो होतो विकारी
म्हणून देऊन टाकलं सारं
झालोय आता भिकारी
--- लबाड बोका
माझ्या साध्या फुंकरीने
वाहू लागायचे वारे
मीच होते भिरकावले
आकाशामध्ये तारे
एवढा मोठा समुद्र सुद्धा
प्यायचो मी घोटात
शनीची सगळी कडी तर
घालायचो मी बोटात
मीच द्यायचो ताप तेव्हा
सा-या या दुनियेला
तेच माझं तेज सारं
मीच दिलं सुर्याला
कधी बरसायचो हवा तसा
बुडवायचो जगाला
तेच सारं जल माझं
मीच दिलं ढगाला
होतं सारं माझ्याकडे
झालो होतो विकारी
म्हणून देऊन टाकलं सारं
झालोय आता भिकारी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा