४२५. अंधार
आकाशात मी बघतो जेव्हा
दिसतो मला चंद्र
तो ही बघतो माझ्याकडे
आणि हसतो मंद
तेव्हा येते आठवण तुझी
वाटतं खूप उदास
तुझ्याशिवाय त्या चंद्राला
अर्थही नसतो खास
वाहू लागते आपोआप
डोळ्यांमधून धार
तशीच संपते रात्र आणि
तरीही उरतो अंधार
--- लबाड बोका
आकाशात मी बघतो जेव्हा
दिसतो मला चंद्र
तो ही बघतो माझ्याकडे
आणि हसतो मंद
तेव्हा येते आठवण तुझी
वाटतं खूप उदास
तुझ्याशिवाय त्या चंद्राला
अर्थही नसतो खास
वाहू लागते आपोआप
डोळ्यांमधून धार
तशीच संपते रात्र आणि
तरीही उरतो अंधार
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा