४२६. सजीव
भिऊन काढला उभा जन्म
पुजत राहिलो सगळीच मखरं
मेल्यानंतर कळलं मला
हे काहीच नव्हतं खरं
दिसला नाही कुठेच स्वर्ग
दिसला नाही कुठेच नरक
उगाच राहिलो जाळत जीव
कळला नाही कधीच फरक
पाप पुण्य नीती अनीती
ह्यातच गेलो होतो गुरफटून
कितीतरी होत्या संध्या
साधायच्याच गेल्या राहून
इच्छा सगळ्या राहिल्या अपु-या
तळमळतोय अजून जीव
धरलं पाहिजे कोणालातरी
म्हणजे मी होईन सजीव
--- लबाड बोका
भिऊन काढला उभा जन्म
पुजत राहिलो सगळीच मखरं
मेल्यानंतर कळलं मला
हे काहीच नव्हतं खरं
दिसला नाही कुठेच स्वर्ग
दिसला नाही कुठेच नरक
उगाच राहिलो जाळत जीव
कळला नाही कधीच फरक
पाप पुण्य नीती अनीती
ह्यातच गेलो होतो गुरफटून
कितीतरी होत्या संध्या
साधायच्याच गेल्या राहून
इच्छा सगळ्या राहिल्या अपु-या
तळमळतोय अजून जीव
धरलं पाहिजे कोणालातरी
म्हणजे मी होईन सजीव
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा