४३०. मढे
फाटून गेलेत कानांचे पडदे
हा असह्य आक्रोश
तरीही आहे सुरूच
वेदनांनी पिळवटताहेत
आतडी आतून
सुन्न बधिर झालंय डोकं
आणि विचारही
भळभळत्या जखमांतून
उडताहेत चिळकांड्या
रक्ताच्या आणि
मांसाचा चिखल खायला
टपली आहेत गिधाडं
तरीही खदाखदा हसते आहे
पाहून माझ्याकडे
माझेच
मढे
--- लबाड बोका
फाटून गेलेत कानांचे पडदे
हा असह्य आक्रोश
तरीही आहे सुरूच
वेदनांनी पिळवटताहेत
आतडी आतून
सुन्न बधिर झालंय डोकं
आणि विचारही
भळभळत्या जखमांतून
उडताहेत चिळकांड्या
रक्ताच्या आणि
मांसाचा चिखल खायला
टपली आहेत गिधाडं
तरीही खदाखदा हसते आहे
पाहून माझ्याकडे
माझेच
मढे
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा