४३१. गुरू
दुखावल्या तर दुखवू देत
तुमच्या सगळ्या भावना
आहात तुम्ही मुर्ख सगळे
मीच एकटा शहाणा
वाटलं ना वाचून वाईट
आला ना माझा राग
सत्य असतं असंच कटू
तेच आणत असतं जाग
मी काय म्हणतो त्याचा
गंभीरपणे करा विचार
आत्मपरीक्षण कराच एकदा
उघडू देत मनाचे दार
अशाच जाईन सांगत नेहमी
युक्तीच्या आणि गोष्टी चार
करा गुरू मला तुमचा
भवसागरातून नेईन पार
--- लबाड बोका
दुखावल्या तर दुखवू देत
तुमच्या सगळ्या भावना
आहात तुम्ही मुर्ख सगळे
मीच एकटा शहाणा
वाटलं ना वाचून वाईट
आला ना माझा राग
सत्य असतं असंच कटू
तेच आणत असतं जाग
मी काय म्हणतो त्याचा
गंभीरपणे करा विचार
आत्मपरीक्षण कराच एकदा
उघडू देत मनाचे दार
अशाच जाईन सांगत नेहमी
युक्तीच्या आणि गोष्टी चार
करा गुरू मला तुमचा
भवसागरातून नेईन पार
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा